Petrol bomb attack on MLA Laxman Jagtap's brother's construction office

सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

    पिंपरी, पिंपरी चिंचवड मधील भाजपचे ज्येष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे (Petrol bomb attack). ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी पिंपळे सौदागर येथे घडली. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड़ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे चन्द्ररंग डेवलपर्स एंड बिल्डर्स प्रा लि नावाचे कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी तीन च्या सुमारास एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी आपल्यावळील दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले. त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले. त्यापैकी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्‍ट्रिक डीपीजवळ पडला.

    सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, सांगवी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे सह अन्य अधिकारी ही घटना स्थळी दाखल झाले आहेत.परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. काचेच्या बाटलीमध्ये काही प्रमाणात पेट्रोल टाकले जाते. दिव्याप्रमाणे त्याची वात बाहेर काढली जाते. ज्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब टाकायचा असतो तिथे ती वात पेटवून बाटली फेकली जाते. बाटली फुटल्यावर स्फोट होतो. याला पेट्रोल बॉम्ब असे म्हणतात.