
मोहल्ला क्लीनिकमधून देण्यात आलेल्या कफ सिरप या औषधाने 16 मुले आजारी पडले असून यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता डिस्ट्रोमेथोर्फन कफ सिरपमुळे मुले आजारी पडले असल्याचे उघड झाले. तपासणी अहवालानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालकांनी दिल्ली सरकारच्या सर्व मोहल्ला क्लीनिक आणि डिस्पेंसरींना नाेटीस जारी करण्याचे निर्देश डीजीएचएसला देण्यात आले आहे(Poisoning due to cough syrup! 3 children died and 16 fell ill; The negligence of Delhi's Mohalla Clinic is on the rise).
दिल्ली : मोहल्ला क्लीनिकमधून देण्यात आलेल्या कफ सिरप या औषधाने 16 मुले आजारी पडले असून यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता डिस्ट्रोमेथोर्फन कफ सिरपमुळे मुले आजारी पडले असल्याचे उघड झाले. तपासणी अहवालानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालकांनी दिल्ली सरकारच्या सर्व मोहल्ला क्लीनिक आणि डिस्पेंसरींना नाेटीस जारी करण्याचे निर्देश डीजीएचएसला देण्यात आले आहे(Poisoning due to cough syrup! 3 children died and 16 fell ill; The negligence of Delhi’s Mohalla Clinic is on the rise).
चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना डिस्ट्रोमेथोर्फन सिरप देण्यात येऊ नये. वास्तविक, याप्रकरणी केंद्र सरकारचे डीजीएचएस यांनी 7 डिसेंबरला लिहिलेल्या पत्रातून ही सूचना दिली आहे.
कलावती सरन रुग्णालयातील डिस्ट्रोमेथोर्फन सिरपच्या पॉयझनिंगचे 16 प्रकरण समोर आले होते. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहेत. या मुलांना कफ सिरफो मोहल्ल क्लिनिकमधून देण्यात आले होते. या प्रकरणी सीडीएससीओ यांनी कफ सिरपची तपासणी केली. यात औषधाची क्वालिटी योग्य नसल्याचे आढळून आले.
याबाबतची सूचना दिल्ली ड्रग कंट्रोलरलाही देण्यात आली आहे. या अहवालानंतर केंद्र सरकारने दिल्ली सरकारला निर्देश देत याबाबतची माहिती सर्व मोहल्ला क्लीनिकला देण्याबाबत सांगितले आहे.