चालत्या दुचाकीवर रोमान्स करणं जोडप्याला पडलं महागात, पोलिसांनी तरुण-तरुणीला केली अटक

21 जानेवारीला दुर्गमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक तरुण जोडपे चालत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत होते. मुलगा बाईक चालवत आहे आणि मुलगी बाईकच्या टाकीवर मुलाकडे तोंड करून बसली आहे, असे व्हिडिओमध्ये दिसतआहे. मुलगी मुलाला मिठी मारून किस करताना दिसत आहे.

    दुर्ग : काही दिवसापुर्वी लखनऊमध्ये चालत्या दुचाकीवर रोमान्स करणाऱ्या जोडप्याच व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता छत्तीसगडच्या दुर्गमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. चालत्या बाईकवर रोमान्स करणाऱ्या  इथल्या एका जोडप्याला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याची चौकशी सुरू केली आणि व्हिडिओच्या आधारे या जोडप्याला शोधून काढलं असून दोघांनाही  अटक  करण्यात आली  आहे.

    आरोपीकडे चोरीची दुचाकी

    मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय आरोपी जावेद हा आपल्या प्रेयसीला घेऊन फिल्मी स्टाईलमध्ये दुचाकीवरून भिलाईच्या टाऊनशिपच्या रस्त्यावर नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन जात होता. यावेळी दोघांचा रोमान्स करतानाच व्हिडिओवरुन पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान तपास सुरु केला असता आरोपीची दुचाकीही चोरीची असल्याच स्पष्ट झाले. आरोपींनी ती दुचाकी 9 हजार रुपयांना विकत घेतली होती. त्याची नंबर प्लेटही काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटू शकली नाही. आरोपी वैशाली नगर परिसरात फर्निचरचे दुकान चालवतो. ज्याने राजनांदगावमध्ये दीड लाख रुपयांची चोरीची दुचाकी केवळ 9000 रुपयांना विकत घेतली. तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय. यासोबतच दुचाकीची नंबर प्लेटही काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटू शकली नाही.

    व्हिडिओ व्हायरल

    21 जानेवारीला दुर्गमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक तरुण जोडपे चालत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत होते. मुलगा बाईक चालवत आहे आणि मुलगी बाईकच्या टाकीवर मुलाकडे तोंड करून बसली आहे, असे व्हिडिओमध्ये दिसतआहे. मुलगी मुलाला मिठी मारून किस करताना दिसत आहे.