दत्तवाड येथे ‘तीन पत्ती’वर पोलिसांचा छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

दत्तवाड (ता. शिरोळ) येथील हॉटेल शुभ्रामध्ये बंद खोलीत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी छापा (Police Raid Action) टाकून रोख रकमेसह ४ लाख ५३ हजार ३३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील हॉटेल शुभ्रामध्ये बंद खोलीत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी छापा (Police Raid Action) टाकून रोख रकमेसह ४ लाख ५३ हजार ३३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    उदय काकासो पाटील यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका बंद खोलीमध्ये तीन पाणी जुगार अड्डा सुरू होता. येथील पोलिसांनी रात्री पावणे अकरा वाजता हॉटेलवर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले.

    याप्रकरणी मल्लाप्पा साताप्पा भिसरकोप (वय ३७), मानतेस महादेव हेगले (वय २८), भीमा अण्णाप्पा दळवाई (वय ३९), इराप्पा रामू बोरगावे (वय ३४), सुरेश बाबाजी जाधव (वय ३७ सर्व रा. भिर्डी ता. रायबाग जिल्हा बेळगाव) तर तौफिक चंदुलाल नदाफ (वय ३५), रवींद्र काकासो पाटील (वय ३५), उदय काकासो पाटील (वय ३४) यांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस  नाईक प्रकाश हंकारे करीत आहेत.