तुळजापूर शहरातील गुरुमाऊली लॉजवर पोलिसांचा छापा; महिलांसह तब्बल ‘इतक्या’ पुरुषांना घेतलं ताब्यात

तुळजापूर शहरातील गुरुमाऊली लॉजवर पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांसह सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय चालताे अशी गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.

    तुळजापूर : तुळजापूर शहरातील गुरुमाऊली लॉजवर पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांसह सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय चालताे अशी गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी येथे धडक कारवाई केली.

    दरम्यान शहरातील वासुदेव गल्ली येथील गुरुमाऊली लॉजवर अवैद्य रित्या वेश्या व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना नुकतीच मिळाली हाेती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी लॉजवर रात्रीच्या सुमारास छापा मारला.

    यावेळी पाेलिसांना लॉजवर अवैद्यरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी तीन महिलांसह सहा पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.