आफताब पूनावालाच्या फ्लॅटमधून पोलिसांनी 5 चाकू केले जप्त

जप्त केलेल्या चाकूची लांबी 5 ते 6 इंच आहे. मात्र या चाकूंनी आफताबने श्रद्धाचा मृतदेह कापला होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  नवी दिल्ली : सध्या दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha walkar Murder Case) हत्या प्रकरण चांगलच गाजतयं. नुकतचं श्रद्धाचा मारेकरी आरोपी आफताबने (Aftab Poonawala) तिची हत्या केल्याची कबुली कोर्टाला दिली. तर दुसरीक़डे पोलीस तपासात अजूनही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. आता पोलिसांना तपासादरम्यान आरोपी आफताब पूनावालाच्या फ्लॅटमधून 5 चाकू आढळून आले आहेत.

   

  आफताब पूनावालाच्या फ्लॅटमधे तपासणी करताना हे चाकू आढळले.  हे चाकू पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांची लांबी 5 ते 6 इंच आहे. या चाकूंनी आफताबने श्रद्धाचा मृतदेह कापला होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळेच ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र,  चौकशीदरम्यान आफताबने श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी आरीचा वापर केल्याचं सांगितलं होतं ती आरी अद्यापर्यंत पोलिसांनी सापडली नाही. त्यामुळे पोलीस अजूनही शोधाशोध करत आहेत.

  काल झाली पॉलीग्राफ चाचणी

  आफताबची दुसऱ्या टप्प्यातील पॉलीग्राफ चाचणी गुरुवारी झाली. दिल्लीतील रोहिणी भागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये ही चाचणी सुमारे 8 तास चालली. यामध्ये आरोपींना 40 प्रश्न विचारण्यात आले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आफताबला सर्व प्रश्न हिंदीत विचारण्यात आले, मात्र त्याने इंग्रजीत उत्तरे दिली. तसेच, उत्तर देताना आफताबला शिंका येत असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. म्हणूनच काही रेकॉर्डिंग स्पष्ट नाहीत. त्याची आजही पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार आहे.

  महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी

  श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच पोलिसांकडे आफताबची तक्रार केल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. आफताबनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारात नमूद केलं होत. तरीही   पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असंही अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी हे वक्तव्य केलं आहे.