पेट्रोल पंपावर पडणार होता दरोडा, पोलिसांना अगोदरच मिळाली माहिती अन् मग…

भिगवण शहरातील सोनाज पेट्रोलपंपावर पडणार होता दरोडा पण भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच उधळून लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी भिगवण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.२१) मध्यरात्री घडली.        

    भिगवण : भिगवण शहरातील सोनाज पेट्रोलपंपावर (Petrol Pump) पडणार होता दरोडा पण भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच उधळून लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी भिगवण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.२१) मध्यरात्री घडली.

    याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदिप आनंद हिरगुडे (वय ३४ वर्षे रा.हारनस, ता. भोर, जि. पुणे), अनिकेत विलास सुकाळे, (वय २३ वर्षे, रा. मूळ रा. काबरे ता. भोर जि. पुणे. सध्या रा. मारूती मंदिराजवळ, रायकरमळा धायरी, पुणे) आणि रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार, (वय. ३३ वर्षे रा. वाकंम्बे ता. भोर, जि. पुणे. सध्या रामारूती मंदिराजवळ, रायकरमळा धायरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर आरोपींकडून भिगवण पोलिसांनी एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुस, एक लोखंडी कटावणी, एक चाकू, एक रस्सी, मिरचीची पूड व एक होंडा कंपनीची ड्रीम युगा दुचाकी (नंबर एम.एच.१२/के.एक्स.६४१९) असा एकूण १ लाख ५ हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मौजे भिगवण ता. इंदापूर गावचे हददीत सागर हॉटेलजवळ असलेल्या सोनाज एचपी पेट्रोलपंपावर ४ ते ५ दरोडेखोर हे सशस्त्र दरोडा घालणार आहेत, अशी गोपनीय माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पवार यांनी भिगवण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून दरोडेखोरांचा डाव उढळून लावत तिघांना ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपूस केली असता आम्ही व आमचे साथीदार शंभुराज मच्छिंद्र जेधे (रा. आंबवडे ता. भोर जि.पुणे, पुनित) (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) मिळून सदर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची कबुली दिली.

    सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधीकारी बारामती गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील, रूपेश कदम, पोलीस अंमलदार इन्कलाब पठाण, समीर करे, आप्पा भंडलकर, रामदास जाधव, सचिन पवार, अंकुश माने, शंकर निंबाळकर, सुभाष गडदे, पोलीस मित्र रवी काळे, विकास गुनवरे, अशोक चोळके यांनी केली.