दिल्लीत राजकीय घडामोडी! संजय राऊत काँग्रेस नेत्यांना भेटणार; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची शरद पवारांसोबत तातडीची बैठक

राजधानी दिल्लीत उद्या राजकीय घडामोडीना वेग येणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख नेते आणो निमंत्रितांची महत्वाची बैठक बोलावली आहे(Political developments in Delhi! Sanjay Raut to meet Congress leaders; NCP National Executive holds emergency meeting with Sharad Pawar).

  मुंबई : राजधानी दिल्लीत उद्या राजकीय घडामोडीना वेग येणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख नेते आणो निमंत्रितांची महत्वाची बैठक बोलावली आहे(Political developments in Delhi! Sanjay Raut to meet Congress leaders; NCP National Executive holds emergency meeting with Sharad Pawar).

  शिवसेना युपीएत सहभागी होण्याच्या चर्चा

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर कॉंग्रेस नेत्यांकडून युपीएच्या मुद्यावर आलेल्या तिव्र प्रतिक्रियानंतर खा संजय राऊत, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची प्रथमच भेट घेत आहेत. या भेटीत ममता बँनर्जींच्या भेटीनंतर झालेल्या रूसव्या भुगव्यांशिवाय शिवसेनेला युपीएमध्ये सहभागी होण्याबाबतच्या चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे.

  भाजपला विरोध करताना कॉंग्रेसला बाजुला करणे शक्य नसल्याचे त्यापूर्वी सामना मध्ये व्यक्त करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्याचाच भाग म्हणून उद्या संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी स्थापन करुन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना शिवसेना एनडीए बाहेर पडली होती. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवेसना राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी झाली नव्हती. त्यानंतर शिवसेना राष्ट्रीत राजकारणात युपीए आणि एनडीए या दोन्ही गटांत नाही.

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

  दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीत पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूका कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विशेष निमंत्रित आणि कार्यकारिणी सदस्य जे मंत्री आहेत त्यांना पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.