सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान; मंगळवारी निकाल

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण २५७३ मतदार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदानासाठी १२ ठिकाणी मतदान केंद्रे तयार केली आहेत. 

    सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण २५७३ मतदार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदानासाठी १२ ठिकाणी मतदान केंद्रे तयार केली आहेत.

    मंगळवारी ( दि . २३ ) मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे . निकालाची मोठी उत्सुकता जिल्ह्यात मतदान लागली आहे.

    शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेस नेते महेंद्र लाड हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांच्या साठी निवडणूक होत असून, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे.

    या निवडणूकीत १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. आघाडीच्या सहकार विकास पॅनेलचे १८ , तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलचे १६ उमेदवार रिंगणात आहेत . काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही लढा देत आहेत . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत, सहकार विकास पॅनेलचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रक्रिया गटातून इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर येथे मतदान केले.