voting

उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम,नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

    अकलूज / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माळशिरस तालुक्यातील नातेपुते माळशिरस, महाळुंग श्रीपूर या नगरपंचायतींसह राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून, मतदान मंगळवारी 21 डिसेंबर सकाळी ७:३० वाजल्यापासून ५:३० वाजेपर्यंत होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केले आहे.

    अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या आधी प्रमाणित करुन प्रसिद्ध करण्याची तारीख 29 पर्यंत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम करण्याची तारीख 30/11/2021 मंगळवारी आहे. नामनिर्देश राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्या करती चा कालावधी 1/12/2021 सकाळी 11 ते 7/12/2021 दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. वरील नामनिर्देश पत्रे स्विकारण्याचा कालावधी 1/12/2021 ते 7/12/2021 सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. शनिवारी दिनांक 4/12/20 21 व रविवार दिनांक 5/12/2021 या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.

    नामनिर्देश पत्राची छाननी व वैद्य रित्या नामनिर्देश बुधवार दिनांक 8/12/2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल. त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र गुरुवार दिनांक 16/12/2021 पर्यंत आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दिवशी केला जाईल. मतदान मंगळवार दिनांक 21/12/2021 रोजी सकाळी 7 .30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत राहणार आहे. मतमोजणी व निकाल बुधवार दिनांक 22/12/20 21 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू राहणार आहे.

    महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम,नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.