
तेजश्रीने तिच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आलेली टीआरपी यादी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत आनंद व्यक्त केला. राज आणि अपूर्वानेही इन्स्टा स्टोरी शेअर केल्या आहेत.
मुंबई: मालिका सुरु होऊन महिनाही उलटला नसला तरी देखील टिआरपी मध्ये प्रथम स्थान मिळवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ही किमया करुन दाखवली आहे नुकत्याच सुरू झालेल्या प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेने. 4 सप्टेंबरला स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपी (Marathi Serial TRP) यादीत पहिल्या स्थान पटकावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून टीआरपी यादीत अव्वल असलेल्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनं हे स्थान पटकावलं आहे.
मराठी मालिकांप्रमाणे त्यांचा टीआरपी हादेखील महत्त्वाचा असतो. यावरुन प्रेक्षकांची कोणत्या मालिकेला सर्वाधिक पंसती आहे याची माहिती मिळते. या टीआरपी यादीत पहिव्या स्थानी गेल्या अनेक महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे. अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आहे. मात्र, आता प्रेक्षकांनी तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि राज हंचनाळे यांच्या जोडीलाही प्रेम दिलं असून त्यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आता टीआरपी यादीत पहिल्या स्थानावर आली आहे. या महिन्यातच सुरू झालेल्या या मालिकेनं ‘ठरलं तर मग’ या मालिकेला मागं टाकत बाजी मारली आहे.
कलाकारांनी व्यक्त केला आनंद
४ सप्टेंबरपासून तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची मुख्य भूमिका असणारी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेने टीआरपीमध्ये केवळ टॉप १० मध्ये स्थान मिळवले नसून ‘आई कुठे काय करते’, ‘ठरलं तर मग’ या आघाडीच्या मालिकांना मागे टाकलं आहे. या मालिकेतील कलाकार तेजश्री, राज, अपूर्वा नेमळेकर यांनी यानिमित्त आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्या आहेत.
पहिल्या पाच स्थानी आहेत स्टार प्रवाहच्या या मालिका
‘या’ मालिका टिआरपी लिस्टमध्ये
अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी ६.८ आहे, तर ‘ठरलं तर मग’ मालिकेचा टीआरपी ६.७ आहे. ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’चा टीआरपी वाढला असून तिसऱ्या स्थानी . ‘तुझेच मी गीत गात आहे’ असून या मालिकेचा टीआरपी ६.५ आहे. चौथ्या स्थानी ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ आहे, या मालिकेचा टीआरपी ६.१ आहे. तर, पाचव्या स्थानी ‘आई कुठे काय करते’आहे.तिचा टीआरपी ६.० आहे.