लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; शरीरसंबंध झाले अन्…..

    नागपूर (Nagpur) : प्रेयसीला ब्लॅकमेल करीत अत्याचार (Atrocities on married women) करणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. मनीष सजन तांबेकर (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषच पानठेला आहे. महिला आणि मनीषमध्ये १४ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. जात आडवी आल्याने दोघांचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर दोघांचेही दुसरीकडे लग्न झाले. दोघांनाही तीन-तीन अपत्ये आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत ते पुन्हा संपर्कात आले. जुने प्रेम पुन्हा उफाळून आले. भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्यात नियमित शरीरिक संबंधही प्रस्थापित होत होते.

    मनीषने या क्षणांचे व्हीडिओ आणि फोटोही काढले होते. तो महिलेच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. वेळी अवेळी तो केव्हाही फोन करून महिलेला भेटायला बोलवत होता. यामुळे महिलेच्या पतीला दोघांच्याही संबंधाची कुणकूण लागली. त्याने महिलेला फटकारत हे सर्व थांबविण्यास सांगितले. महिलेने मनीषपासून दुरावा केला. हे मनीषला सहन झाले नाही.

    तो महिलेला वारंवार फोन आणि मेसेज करू लागला. मात्र, मिहला त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होती. तो रस्त्याने येता-जाता महिलेचा पाठलाग करून लज्जास्पद वर्तन करू लागला. त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ (Pornographic videos) दाखवून ब्लॅकमेल (Blackmail) करू लागला. हा त्रास असह्य झाल्याने महिलेने नवऱ्याला याबाबत सांगितले.

    दोघांनी जरीपटका पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी मनीषविरुद्ध लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाईलही जप्त केला. त्यात पोलिसांना महिलेचे अश्लील व्हीडिओही आढळले.