अग्निपथ योजनेवर आंदोलनांमुळे पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली खंत

भारताच्या दुर्देवाने चांगल्या उद्देशासाठी केलेल्या काही गोष्टी राजकारणात अडकत आहेत, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. दिल्ली-एनसीआरमधील केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या विकास कामाच्या अनुषंगाने त्यांनी भाषण केले.

    भारतीय सैन्यात भरतीसाठी लागू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेच्या (Agnipath Scheme) मुद्यावर युवकांकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन सुरू आहे. तर, काही ठिकाणी आंदोलनाला (Protest) हिंसक वळण लागले असून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून अग्निपथ योजनेच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आले आहे. भारताच्या दुर्देवाने चांगल्या उद्देशासाठी केलेल्या काही गोष्टी राजकारणात अडकत आहेत, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

    दिल्ली-एनसीआरमधील केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या विकास कामाच्या अनुषंगाने त्यांनी भाषण केले. प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉरच्या (Integrated Transit Corridor) मुख्य बोगद्याचे आणि पाच अंडरपासचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले की, चांगल्या हेतूने राबवण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी या राजकारणात अडकल्या जात आहेत. प्रसार माध्यमेदेखील (Media) टीआरपीसाठी (TRP) या गोष्टींत अडकत आहेत. सेंट्रल विस्टा आणि संसदेच्या नव्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, देशाच्या राजधानीबाबत येत्या चांगली चर्चा होणार असून प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.