पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर ; रे नगर घरकुल हस्तांतरण सोहळ्यासाठी राहणार उपस्थित

महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव वलसा नायर सिंग याची माहिती.

    सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी 19 जानेवारी रोजी सोलापूर ला येणार आहेत.19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित झालेला आहे.अशी असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनी द्वारा रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना दिली आहे.त्या अनुषंगाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात ,जल्लोषात स्वागत करणार येणार आहे. सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान 1 लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे. समाजाच्या सर्व थरांतील,सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत.ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे.हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

    पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील 30 हजार असंघटीत कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रे नगर फेडरेशन, म्हाडा यांच्या पुढाकरातून जगातील एकमेव अभिनव अशा 30 हजार घरांचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्पातील 15 हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे. याच्या पूर्वतयारी करीता रे नगर कुंभारी येथे नियोजनासाठी मा.जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक ग्रामीण,म्हाडा संबधित सर्व अधिकारी, रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर,रे नगर चे चेअमन नलिनीताई कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे,माजी नगरसेविका कामिनी आडम आदी समावेत शासकीय बैठका पार पडल्या आहेत.