प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान

शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त सलग्न महाविद्यालयातील 'गुणवंत प्राचार्य पुरस्कार २०२१’ हा सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांना शिवाजी विद्यापीठामार्फत प्रदान करण्यात आला. डॉ. मोहन राजमाने यांनी प्राचार्य म्हणून महाविद्यालयात आजवर अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली.

    कराड : शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त सलग्न महाविद्यालयातील ‘गुणवंत प्राचार्य पुरस्कार २०२१’ हा सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांना शिवाजी विद्यापीठामार्फत प्रदान करण्यात आला. डॉ. मोहन राजमाने यांनी प्राचार्य म्हणून महाविद्यालयात आजवर अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. या सेवा कालावधीत महाविद्यालयाप्रती आपली निष्ठा, कार्यतत्परता, उत्कृष्ट अध्यापन व प्रशासन विविध समित्यांवर केलेले प्रतिनिधित्व तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमोल योगदान या प्रमुख बाबी विचारात घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    प्राचार्य डॉ. मोहन राजमाने सन २००६ पासून आजअखेर सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. या महाविद्यालयाची गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रीभूत ठेऊन त्यांनी महाविद्यालयाचा चेहरा-मोहरा बदलला, सुसज्ज व अत्याधुनिक इमारतीबरोबरच पदवी, पदव्युत्तर एम. फिल., पीएच. डी या पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थाच्या सर्वांगीण चालना देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, आधुनिक काळात व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता ओळखून कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्याना नोकरीबरोबरच व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

    सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठ कर्यक्षेत्रातील A’ मानांकन CGPA 3.63 मिळवणारे पहिले महाविद्यालय असून, ISO प्रमाणित असणारे हे महाविद्यालय सन २०१९ पासून स्वायत्त करण्यात प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांचे दूरदृष्टी योगदान आणि प्रचंड मेहनत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

    त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ऍड. रवींद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. प्रिं. डॉ. व्ही. एस. शिवणकर, सहसचिव प्रिं. डॉ. प्रतिभा गायकवाड, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.