प्रियंका गांधी यांचा मै लडकी हू, लड सकती हू’चा नारा; १४ डिसेंबर रोजी गडचिरोलीत येणार

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka gandhi) या १४ डिसेंबर रोजी गडचिरोली येथे येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली.

    गडचिरोली (Gadchiroli) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka gandhi) या १४ डिसेंबर रोजी गडचिरोली येथे येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar)यांनी दिली.

    शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात त्यांची सभा होणार आहे. प्रियंका गांधी यांनी ‘मै लडकी हू, लड सकती हू’ असा नारा दिला होता. महिलांच्या मजबुतीसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात सातत्याने प्रियांका गांधी रस्त्यावर उतरून काम करत असतात. त्या अनुषंगाने आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील महिला आणि युवतीसोबत त्या संवाद साधणार आहेत.

    गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठे उद्योग धंदे नाहीत हाताला काम नसल्याने हलाखीच्या परिस्थितीमुळे अजूनही काही मुली महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाहीत.अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील विद्यार्थिनींची अडचण दूर व्हावी त्यांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी म्हणून दहा हजार विद्यार्थिनींना प्रत्येकी १४ हजार रुपयाची इलेक्ट्रिक सायकल टीएसआर फंडातून वितरित केली जाणार आहे.

    प्रियंका गांधी यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याचे मदत, पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवाजी महाविद्यालयात जाऊन पाहणी केली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.