महानगरपालिका अन् भाजपच्या कार्यप्रणालीचा निषेध; गटनेते आनंद चंदनशिवे यांचा ठिय्या

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजप पक्षाच्या कार्यप्रणालीचा गटनेते आनंद चंदनशिवे यांनी निषेध केला.

    केंद्र शासन, राज्य शासन तसेच सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील स्ट्रीट मार्केट एडवेंचर पार्क रंगभवन प्लाझा या ठिकाणची आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने लोकार्पण सोहळा व उद्घाटन समारंभ आयोजित केला होता.

    यापवेळी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगली दिशा देण्याचं काम केले आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज सोलापूर शहरातील ॲडवेंचर पार्क स्ट्रीट मार्केट बाजार रंगभवन प्लाझा येथील लोकार्पण सोहळा उद्घाटन समारंभ आयोजित केला होता.

    सदर प्रकल्प गेल्या दोन ते तीन वर्षापासून पूर्ण झालेले असून, त्यांचा मेंटेनन्स कालावधी आला असून, एडवेंचर पार्कमधील विविध वस्तूंचे एक्सपायरी डेट संपलेली आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सदर उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला.

    महापालिकेच्या प्रोटोकॉलनुसार, नामफलकाचे उद्घाटन केलं. यावरती महापालिकेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा नावाचा उल्लेख नसल्याने व सोलापूरला उशिरा सर्व व बंद अवस्थेतील सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व महापालिका प्रशासन यांचा जाहीर निषेध केला.

    या कार्यक्रमप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांत, आयुक्त पी. शिवशंकर, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, विरोधी पक्ष नेते अमोल बापु शिंदे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, गटनेते रियाज खैरादी, मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका वहिदाबी शेख, नगर अभियंता संदीप कारंजे, अभियंता बागवान श्रीमंत जाधव अविनाश भडकुंभे चाचा सोनावणे उपस्थित होते.