सोनी लिव्‍हची सिरीज ‘युअर ऑनर २’मधील पुल्कित माकोल योग्‍य शरीरयष्‍टीसाठी ३ महिने राहिला गोव्‍यामध्‍ये!

अभिनयाचा सर्वात रोमांचक पैलू म्‍हणजे भूमिकेची सर्जनशीलता व कम्‍फर्ट झोनला आव्‍हान करणे आणि 'युअर ऑनर २'मधील पुल्कितचा अभिनय या गोष्‍टींना सादर करतो. पुल्कित मकोलने त्‍याच्‍या भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी भारताचा प्राचीन मार्शन आर्ट कल्‍लरिपयूट्टूचे प्रशिक्षण घेतले.

    मुंबई : सोनी लिव्‍हची सिरीज ‘युअर ऑनर’ (Your Honor)मधून प्रसिद्धी मिळालेला पुल्कित माकोल (Pulkit Makol( (अबीर) दुसऱ्या सीझनसह परतला आहे. पहिल्‍या सीझनमध्‍ये घातक गुंडाची हत्‍या केल्‍यानंतर बिशन खोसलाच्‍या (जिम्‍मी शेरगिल) मुलाला या सीझनमध्‍ये तुरुंगवास होण्‍याची भिती आहे. अबीरची भूमिका बहुस्‍तरीय असली तरी ‘युअर ऑनर २’मध्‍ये पूर्णत: ॲक्‍शनमध्‍ये आली आहे. अभिनेत्‍याने त्‍याप्रती अगदी प्रामाणिकपणे काम केले आहे आणि हे काम त्‍याने केलेल्‍या तयारीमधून दिसून येते.

    अभिनयाचा सर्वात रोमांचक पैलू म्‍हणजे भूमिकेची सर्जनशीलता व कम्‍फर्ट झोनला आव्‍हान करणे आणि ‘युअर ऑनर २’मधील पुल्कितचा अभिनय या गोष्‍टींना सादर करतो. पुल्कित मकोलने त्‍याच्‍या भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी भारताचा प्राचीन मार्शन आर्ट कल्‍लरिपयूट्टूचे प्रशिक्षण घेतले. त्‍याच्‍या भूमिकेच्‍या बदलत्‍या रचनेसह मानसिकता व देहबोली देखील त्‍यामधून दिसून येण्‍याची गरज होती. भूमिका योग्‍य असण्‍यासाठी सिरीजच्‍या निर्मात्‍यांनी पुल्कितला कल्‍लरिपयट्टूचे प्रशिक्षण देण्‍याचे ठरवले.

    कल्‍लरिपयट्टूचे प्रशिक्षण घेतानाच्या आव्‍हानांबाबत सांगताना तो म्‍हणाला, ”शूटिंगच्‍या चार महिन्‍यांपूर्वी मला कल्‍लरिपयट्टूचे प्रशिक्षण घेण्‍यासाठी गोव्‍याला पाठवण्‍यात आले. तेथे मी ३ महिने मार्शल आर्टिस्‍ट म्‍हणून प्रशिक्षण घेतले. रोचक बाबत म्‍हणजे विविध प्राण्‍यांच्‍या हालचाली आणि माझ्या शरीररचनेचे विविध भाग समजले. ज्‍यामुळे मला अबीर या माझ्या भूमिकेमधील प्राण्‍याचे गुण दाखवण्‍यास मदत झाली. यामधून मला योद्धाची मानसिकता मिळाली, मला शिस्‍तबद्धता व हान न मानण्‍याची वृत्ती समजली, जे या सीझनमध्‍ये अबीरची भूमिका साकारण्‍यासाठी आवश्‍यक होते.”

    निश्चितच, पहिल्‍या सीझनपासून दुसऱ्या सीझनपर्यंत अबीरमधील परिवर्तन अत्‍यंत रोचक आणि ‘युअर ऑनर २’मध्‍ये बघण्‍यासारखे आहे. ॲप्‍लॉज एंटरटेन्‍मेंटने स्‍पेअर ओरिजिन्‍ससोबत सहयोगाने या सिरीजची निर्मिती केली आहे आणि ई-निवासने दिग्‍दर्शन केले आहे.

    पहा ‘युअर ऑनर २’ सोनी लिव्‍हवर.