शिंदे सेनेला पुण्यात मोठा धक्का! अनेक पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

पुण्यातील शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षांला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये प्रचारामध्ये लक्षात न घेतल्यामुळे पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत.

    पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काल (दि.13) पार पडली. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शिंदे गटाला पुण्यामध्ये जोरदार धक्का बसला आहे. निवडणूकीनंतर शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पुण्या

    तील शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षांला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये प्रचारामध्ये लक्षात न घेतल्यामुळे पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यामध्ये दौरे होत असतात. मात्र पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून डावलले जात असल्याची तक्रार पदाधिकारी करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या. आता लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर आली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील नाराजी व्यक्त केली आहे.

    लोकसभा निवडणूकीच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासमोर शहरामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते. पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. पूर्ण तयारी देखील कार्यकर्त्यांनी उत्साहाने केली. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐनवेळी ते रद्द केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे.