पुण्यात कॉंग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादावरुन लढाई; काही काळ तणावाचे वातावरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP)व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले.

    पुणे : पुण्यामध्ये कॉंग्रेस (Congress) व महायुती सरकारमध्ये श्रेयवादावरुन जोरदार लढाई झाली आहे. पाण्याच्या टाकीच्या बांधकामावरुन दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना भीडले आहेत. गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP)व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat) यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी मधस्थी करुन देखील त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना देखील पोलिसांनी आतमध्ये जाण्यास रोखल्यामुळे पोलीस आणि पत्रकारमध्ये देखील वाद झाले.

    पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या मतदार संघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन होणार होते. मात्र त्यापूर्वी आमदार धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी उद्घाटन केले. “काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी गोखलेनगर भागातील नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनासोबत वेळोवेळी पाठपुरावा केला. आज खऱ्या अर्थाने या भागातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. त्या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पण येथील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांचा फोटो टाकला नाही किंवा कार्यक्रमाला निमंत्रण देखील दिले नाही. या निषेधार्थ आम्ही कार्यक्रमापूर्वीच उद्घाटन केले.” अशी भूमिका आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली.

    पुढे ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा सन्मान करत असतात. मात्र, आज अजित पवार ज्या पक्षासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत त्या नेत्यांची अजित पवार नक्कीच कानउघाडणी करतील.” या प्रकाराबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे देखील धंगेकरांनी स्पष्ट केले.