महापालिका करणार सौर ऊर्जानिर्मिती; ‘एसपीव्ही’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी

महापालिकेच्या विद्युत विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्यास मंजुरी दिल्याची माहीती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परीषदेत दिली. हा प्रस्ताव मुख्य सभेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

    पुणे : सार्वजनिक पथदिव्यांवरून होणारी वीज चोरी राेखण्यात अपयशी ठरलेल्या महापािलकेने आता वीज खर्चात बचत करण्यासाठी सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात उरतण्याचे ठरविले आहे. ओपन अॅक्सेसमधून कमी दरात पुढील वर्ष वीज खरेदी करण्यात येणार अहे. यासाठी ‘सीईएसएल’ याशासकीय संस्थेसोबत ‘एसपीव्ही’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.