पुण्याच्या नेहा नारखेडेनं 37 व्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान, ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती

हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये नेहा नारखेडे हिने 336 वं स्थान पटकावलं आहे. नेहा नारखेडे यांची एकूण संपत्ती अंदाजे 4700 कोटी रुपये इतकी आहे.

    मूळची भारतीय असलेली नेहा नारखेडेनं ( स्वत:च्या हिमतीवर IIFLवेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 (Wealth Hurun India Rich List ) मध्ये स्थान पटकावलं आहे. 37 वर्षीय नेहा नारखेडेनं मेहनत, चिकाटीच्या बळावर हे यश मिळवलयं. भारतीय-अमेरिकन महिलेला श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वात तरुण सेल्फमेड महिला उद्योजक म्हणून तिला गौरविण्यात आलं आहे.

    नेहा नारखेडे ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील झोडगा या गावची आहे. आई वडील नोकरी निमित्त पुण्याला आले होते. नेहाचा जन्म पुण्याच्याच आहे. तिचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर तिने जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतलं. तिची कंपनी सुरू करण्यापूर्वी, नेहाने LinkedIn आणि Oracle सारख्या कंपनीत काम केलं आहे. नेहा नारखेडे सध्या ‘कंफ्लुएंट’ या कंपनीची सह संस्थापक आहे. त्याशिवाय आपाचे काफ्का (Apache Kafka) या ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टमला डेव्हलप करण्याच कामही ती करते. नेहा नारखेडे सध्या अनेक तंत्रज्ञान कंपनीमध्ये सल्लागार आणि गुंतवणूकदार आहे. हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये नेहा नारखेडे हिने 336 वं स्थान पटकावलं आहे. नेहा नारखेडे यांची एकूण संपत्ती अंदाजे 4700 कोटी रुपये इतकी आहे.

     

    फोर्ब्सनुसार,  2022 च्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत स्वयं-निर्मित महिलांच्या यादीत नेहाला  57 वे स्थान मिळाले आहे. तर, 2018 मध्ये फोर्ब्सने तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील टॉप 50 महिलांपैकी एक म्हणूनही तिचा गौरव केला आहे.