
पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी टेनिसन पटू ऋतुजा भाेसले ही अाॅलिम्पिकच्या तयारीकरीता सर्व आर्थिक मदत करण्यास तयार असल्याचे पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांनी जाहीर केले आहे.
भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपच्या स्टार खेळाडू ऋतुजा भोसले यांनी मिक्स डबल मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले त्याबद्दल त्यांचा पुनीत बालन ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी माहीती दिली. यावेळी ऋतुजानेही पुनीत बालन ग्रुपचे आभार मानले.
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रार्थना ठोंबरे, मी आणि अंकिता रैना अशा तीन महिला टेनिसपटू सहभागी झालेले होते. मिश्र दुहेरीच्या लढतीसाठी रोहनने जेव्हा माझी निवड केली त्यावेळी खुप आनंद झाला. अंतिम सामन्याच्या पहिला सेट आम्ही हारलो. त्यावेळी रोहनने केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला सहज सुवर्णपदक पटकावित देशाचे राष्ट्रगीत व तिरंगा परदेशात फडकावत आला. तो क्षण माझ्यासाठी गोल्ड क्षण आहे. यासाठी माझ्या फैमिली बरोबर पुनित सरांनी प्रोत्साहन व सपोर्ट दिला. त्यामुळे हे शक्य झाले. मी त्यांची खूप आभारी आहे’’ अशा भावना ऋतुजाने व्यक्त केल्या.
पुढे बोलताना ऋतुजा म्हणाली ‘‘आगामी काळात ऑस्ट्रेलियन ओपन बरोबर ऑलिम्पिक स्पर्धा ही येत आहेत. त्याची तयारी आत्तापासूनच करणार आहे. प्रशिक्षकांकडूनही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असून आगामी ऑलिम्पिकचे ध्येय बाळगले अाहे. ’’
यावेळी बोलताना पुनित बालन म्हणाले की, ऋतुजा ने मेडल जिंकून बालन ग्रुप चे नाही तर महाराष्ट्राचे, पुण्याचे नाव देशात उंचावले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. ऋतुजा सारख्या गुणी खेळाडू ना मदत करण्यास बालन ग्रुप नेहमी पुढे राहिलं. तिला ओलंपिक तयारी साठी आम्ही सर्व प्रकारे आथिर्क मदत करण्यास तयार आहोत. तिने फक्त आलंपिक साठी मेडल जिंकावे हीच आमची इच्छा आहे.