पंजाब विधानसभा निवडणूक; शेतकरी कोणाला देणार समर्थन?

आपल्या पार्टीद्वारे शेतकऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यासाठी आता विचारविनिमय सुरू आहे. सिंघू बॉर्डरवर लखबीर सिंह यांच्या हत्याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची गरज आहे. कारण हे प्रकरण भाजपा व गुप्तचर संस्थांशी संबंधित आहे. ‘पंजाब मॉडेल’मध्ये मजुरांना कामाचा हक्क देणार असून मनरेगाप्रमाणे सुविधा उपलब्ध करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी सांगितले. शहरी भागातील मजुरांसाठी ‘पंजाब मॉडेल’ राबविण्यात येणार आहे.

    चंदीगड. पंजाब विधानसभा निवडणुकीत (panjab election) किसान युनियन कोणाला समर्थन देणार, यावरून चर्चा सुरू आहे. शेतकरी ज्यांना समर्थन देतील त्यांचे पारडे निवडणुकीत जड हाेणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मतांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांशी संबंधित 22 संघटनांनी आपले विचार व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षांच्या उद्देशापेक्षा मोठा आहे. किसान युनियने कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षांसोबत जाण्याऐवजी आवश्यकता पडल्यास वेगळा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवायला हवी, असे शेतकरी संघटनांचे मत आहे.

    किसान मोर्चात फूट
    संयुक्त किसान मोर्चात येणाऱ्या शेतकरी संघटनांच्या या बैठकीत फुटीचे संकेत मिळाले आहे. या मोर्चात एकूण 32 शेतकरी संघटना आहेत. या बैठकीत केवळ 25 संघटनांनाच येण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. भारतीय किसान युनियन राजेवालचे अध्यक्ष बलबीर सिंह राजेवाल आणि बीकेयू सिद्धूपूर प्रमुख जगजीत सिंग ढालेवाल यांच्यातील दुरावा वाढला आहे. त्यामुळे किसान मोर्चात फूट पडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

    7 संघटना बैठकीला उनुपस्थित
    संयुक्त किसान मोर्चात सहभागी 7 संघटनांमध्ये क्रांतिकारी किसान युनियन, बीकेयू क्रांतिकारी, आझाद किसान कमेटी दाओबा, बीकेयू सिधूपूर, लोक भलाई वेल्फेयर इंसाफ कमेटी, गन्ना संघर्ष कमेटी दासूया, जय किसान आंदोलन या संघटनांना या बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले नव्हते.

    मजुरांना देणार हक्क
    ‘पंजाब मॉडेल’मध्ये मजुरांना कामाचा हक्क देणार असून मनरेगाप्रमाणे सुविधा उपलब्ध करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी सांगितले. शहरी भागातील मजुरांसाठी ‘पंजाब मॉडेल’ राबविण्यात येणार आहे. शहरी भागात रोजगार गॅरंटीची सुरुवात करणार आहे. अकुशल कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. अडीच एकरात जो कोणी शेतकरी व मजूर काम करणार त्यांना सन्मान व भत्त्यानुसार मनरेगा मिळायला हवी, असे सिद्धू यांनी सांगितले. मनरेगावरील मजुरांची नोंदणी झाली नाही त्यांना लाभ देण्यात येत नाही. त्यामुळे नोंदणीसाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मजुरांना बीपीएल कार्ड मिळायला हवे. जो कोणी गरीब आहे त्यांना ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल. मजुरांना देण्यात येणारे फायदे घेण्यासाठी त्यांना नोंदणी करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मनरेगात काम करणाऱ्यांना 280 रुपये मजुरी मिळते. ती वाढविण्याची गरज आहे, असे सिद्धुंनी सांगितले.

    गुरनाम चढुनी बनवणार नवीन पार्टी
    भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंग चढुनी यांनी नवीन पार्टी स्थापण करण्यात येणार असल्याचे सांगितले. पंजाबच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. लक्खा सिधाना यांच्यावर यावेळी टीका केली.

    शेतकऱ्यांना देणार उमेदवारी
    आपल्या पार्टीद्वारे शेतकऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यासाठी आता विचारविनिमय सुरू आहे. सिंघू बॉर्डरवर लखबीर सिंह यांच्या हत्याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची गरज आहे. कारण हे प्रकरण भाजपा व गुप्तचर संस्थांशी संबंधित आहे. कारण या घटनेमागे मोठे कटकारस्थान असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. दिल्लीत हरयाणाचे निहंग नवीन संधू यांच्यावरून लक्खा सिधाना यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या वक्तव्यावर टीका करीत पूर्ण चौकशी केल्यानंतरच बोलावे, असे चढुनी यांनी यावेळी सुनावले.