मुंबईत पुरी भाजी विक्रेत्याचं ग्राहकाशी भांडण, लहान मुलीसह दोघांवर फेकलं उकळतं तेल

मुंबईत पुरी भाजी विक्रेत्याचं ग्राहकाशी भांडण झालं. पुरी भाजीवाल्याने लहान मुलीसह दोघांवर उकळतं तेल फेकलं. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, चुनाभट्टी पोलीस या प्रकरणात कोणतीही गंभीरता घेत नसून आरोपी खुलेआम फिरत आहे.

    मुंबई : कुर्ला कसाई वाडीत पुरी भाजी विकणाऱ्याने घरगुती भांडणामुळे पुरी भाजी घेण्यासाठी आलेल्या एका सात वर्षीय मुलीच्या आणि वयोवृद्ध यांच्यावर तेल फेकले यात दोघे जण जखमी झाले आहेत तर सात वर्षीय लहान मुलीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

    मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, चुनाभट्टी पोलीस या प्रकरणात कोणतीही गंभीरता घेत नसून आरोपी खुलेआम फिरत आहे तर चुनाभट्टी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे की, या प्रकरणात कलम 337, 338, 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.