मागासवर्गीय विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी; केईएम रुग्णालयातील रॅगिंग प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्याच्या महापौरांच्या सूचना

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयात एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बुधवारी महापौरांनी केईएम रुग्णालयाला भेट देऊन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले(Racial slurs, threatening to beat a backward class student; Mayor's instructions to take legal action in KEM hospital ragging case).

    मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयात एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बुधवारी महापौरांनी केईएम रुग्णालयाला भेट देऊन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले(Racial slurs, threatening to beat a backward class student; Mayor’s instructions to take legal action in KEM hospital ragging case).

    मुंबई महापालिकेचे परळ येथे केईएम रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयात शिकणा-य़ा एका विद्यार्थ्याला जातीवाचक शिव्या तसेच मारहाण करण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे. याबाबत कारवाईची मागणी करण्यासाठी मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्यानी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली.

    केईएम प्रशासन आणि पीडीत मुलगा तसेच ज्यांनी हा प्रकार केला त्यांना समोरासमोर उभे केले. पीडीत मुलाच्या वडीलांबरोबर बोलणे झाले. एक आई आणि महापौर म्हणून सल्ला दिला आहे. पीडित मुलगा आणि इतर मुलांना वेगळे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या मुलावर प्रशासनाला लक्ष ठेवायला सांगितले आहे. या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जे काही आहे ते समोर येईल असे महापौर म्हणाल्या.