राहुल गांधींनी महाराष्ट्रातून घेतला निरोप; भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात

राहुल गांधी आजपासून निवडणूक प्रचारासाठी गुजरात दौऱ्यावर जाणार असल्याने ही यात्रा पुढील दोन दिवस महाराष्ट्रातच राहणार आहे. राहुल गांधी गुजरातहून परतल्यानंतर ते मध्य प्रदेशच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. राहुल गांधी यांनी निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

    मुंबई – जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अखेर महाराष्ट्रातून निरोप घेतला. भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने राहुल गांधी महाराष्ट्रात होते. आता भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) जाणार आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा कालचा शेवटचा दिवस होता.

    राहुल गांधी आजपासून निवडणूक प्रचारासाठी गुजरात दौऱ्यावर (Gujarat Election) जाणार असल्याने ही यात्रा पुढील दोन दिवस महाराष्ट्रातच राहणार आहे. राहुल गांधी गुजरातहून परतल्यानंतर ते मध्य प्रदेशच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. राहुल गांधी यांनी निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

    शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्य, बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान, महात्मा फुले यांची शिकवण, आणि सर्व महाराष्ट्रवासियांचं प्रेम प्रेरणा समजून पुढे जात आहे. या सत्कार आणि अभूतपूर्व अनुभवासाठी मी प्रदेशातील लोकांचे मनापासून आभार मानतो. जय शिवाजी, जय महाराष्ट्र! असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.