राहुल गांधींची आज सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून होणार चौकशी

सोमवारी (13 जून) सुमारे 8.30 तास चौकशी करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (14 जून) ही चौकशी दहा तासांहून अधिक काळ चालली.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. सलग दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. काल दिवसभरात सुमारे दहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. ( Rahul Gandhi ED inquiry ) त्यानंतर ते रात्री 9:15 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. दरम्यान, आजही राहुल गांधी चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

    सोमवारी आणि मंगळवारी राहुल गांधींची ईडी चौकशी झाली. सोमवारी (13 जून) सुमारे 8.30 तास चौकशी करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (14 जून) ही चौकशी दहा तासांहून अधिक काळ चालली. या दरम्यान चौकशी असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. कालही काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, दीपेंद्र सिंग हुड्डा, रंजीत रंजन, इम्रान प्रतापगढी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.