आज पुन्हा राहुल गांधीची होणार ईडी चौकशी, काल साडेदहा तास झाली चौकशी

पण काल (सोमवारी) एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून दोन टप्प्यात साडेदहा तास चौकशी झाली. चौकशीनंतर राहुल गांधी ईडी कार्यालयाबाहेर पडले. राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून (ED) दोन टप्प्यात साडेदहा तास चौकशी केली जाणार आहे. आज पुन्हा चौकशी होणार आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी सुरु आहे. पण काल (सोमवारी) एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

    दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 459 काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची सुटका केली. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयावर मोर्चा काढत असताना या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर हे लोक गांधीगिरीवर उतरले.