कोल्हापुरात पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी…

कोल्हापुरात अचानक पाऊस (Kolhapur Rain) झाला. या पावसामुळे कोल्हापुरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी शाळा, क्लासेसला जाणारे विद्यार्थी, नोकरदार मंडळींना छत्र्या, रेनकोटचा आधार घ्यावा लागला. अर्धा तास पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले.

    कोल्हापूर : कोल्हापुरात अचानक पाऊस (Kolhapur Rain) झाला. या पावसामुळे कोल्हापुरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी शाळा, क्लासेसला जाणारे विद्यार्थी, नोकरदार मंडळींना छत्र्या, रेनकोटचा आधार घ्यावा लागला. अर्धा तास पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले.
    कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, सकाळी सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाचा फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरांना बसला असून, कापणी केलेले भात भिजले आहे. गेले आठवडाभर जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी पडत आहेत. सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने हिवाळ्यातही पावसाळ्याचा भास होत होता.
    सकाळी साडेआठ वाजता रिमझिम पावसास सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी शाळा, क्लासेसला जाणारे विद्यार्थी, नोकरदार मंडळींना छत्र्या, रेनकोटचा आधार घ्यावा लागला. अर्धा तास पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. गेले आठवडाभर पावसाचा फटका गूळ आणि साखर हंगामाला बसला आहे. पावसामुळे ऊस तोडणी थांबली असल्याने त्याचा परिणाम साखर कारखाने आणि गुऱ्हाळघरांना बसला आहे.