राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – रामदास आठवले

आता राज यांनी माफी मागावी आणि आयोध्येला जावे असे उत्तर भारतीयांचे म्हणणे आहे.

    नांदेड : राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येला जावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. ते नांदेड येथे आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी ऊत्तर भारतीयांना मोठा विरोध केला होता. आता राज यांनी माफी मागावी आणि आयोध्येला जावे असे उत्तर भारतीयांचे म्हणणे आहे. त्यात चुकीचे काही नाही. ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला त्याचे स्वागत देखील आठवलेयांनी केले.