उदयनराजे व शिवेंद्रराजे हे सध्या एकाच पक्षात असले तरी सातारा जिल्ह्यातील प्रमुख सत्तास्थानांवर वर्चस्व राखण्यासाठी त्यांच्यात नेहमीच चढाओढ असते. जिल्हा बँक निवडणुकीपाठोपाठ आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शह-काटशहचा खेळ सुरू झाला आहे(Udayan Raje Vs Shivendra Raje).
सातारा : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. २० वर्षांपूर्वीची आठवण सांगत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना टोला हाणला होता. त्या टीकेवरून आमदार शिवेंद्रराजे यांनीही ‘साताऱ्यात सध्या नारळफोड्या गँग फिरत आहे’, अशा शब्दात पलटवार केला.
उदयनराजे व शिवेंद्रराजे हे सध्या एकाच पक्षात असले तरी सातारा जिल्ह्यातील प्रमुख सत्तास्थानांवर वर्चस्व राखण्यासाठी त्यांच्यात नेहमीच चढाओढ असते. जिल्हा बँक निवडणुकीपाठोपाठ आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शह-काटशहचा खेळ सुरू झाला आहे(Udayan Raje Vs Shivendra Raje).
हद्दवाढीचा निर्णय सुद्धा या आधीच झाला असता, पण उदयनराजेंनी राजकारण करत त्यांच्या बगलबच्यांना संभाळण्यासाठी हा निर्णय होऊ दिला नाही. आता निवडणुका जवळ येतील तसे यांचे नारळ फोडायचे कार्यक्रम आणखी वाढतील असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.