Udayan Raje Vs Shivendra Raje

खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. दोन्ही राजे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. यामुळे एन थंडीत साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे( Raje vs Raje: Seeing the invention and prowess of Udayan Raje's intellect, his intellect gets angry; Shivendra Raje's harsh criticism ).

    सातारा: खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. दोन्ही राजे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. यामुळे एन थंडीत साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे( Raje vs Raje: Seeing the invention and prowess of Udayan Raje’s intellect, his intellect gets angry; Shivendra Raje’s harsh criticism ).

    उदयनराजे भोसले यांची अफाट आणि अचाट बिद्धी पाहता त्यांनी निवडून आलेल्या खासदरकीचा राजीनामा का दिला आणि मागच्या दराने ते राज्यसभेत का गेले हे पाहूनच त्यांच्या बुद्धीची आणि आमच्या बुद्धीची तुलना होऊ शकत नाही असा हल्लाबोल शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

    उदयनराजेंच्या बुद्धीचे आविष्कार आणि पराक्रम पाहून त्यांच्या बुद्धीची कीव येते अशी घणाघाती टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने या दोन नेत्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

    रविवारी उदयनराजेंनी आ.शिवेंद्रराजे भोसले यांची छोटी बुद्धी आहे अशी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत उदयनराजेंवर टीका केली आहे.