rajiv kumar

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार यांनी ३६ हून अधिक वर्षे शासकीय सेवा केली आहे. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचं कामकाज सांभाळलं आहे.

    दिल्ली : राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या १५ मे रोजी राजीव कुमार आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. राजीव कुमार यांच्या आधी सुशील चंद्रा (Sushil Chandra) मुख्य निवडणूक आयुक्त होते. सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी पूर्ण होईल. विधी मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्विट केलं आहे.


    राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी २०२० साली निवडणूक आयुक्त (Election Commissioner) म्हणून पदभार स्वीकारला होता. राजीव कुमार हे झारखंड कॅडरचे १९८४ बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आता ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत. ते २०२५ मध्ये सेवानिवृत्त होतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुका देखील आता त्यांच्या नेतृत्वातच होतील. निवडणूक आयुक्त पदासाठीचा कार्यकाळ हा सहा वर्षांसाठी असतो.

    राजीव कुमार यांनी ३६ हून अधिक वर्षे शासकीय सेवा केली आहे. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचं कामकाज सांभाळलं आहे. ते २०२० साली केंद्रीय वित्त सचिव म्हणून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांची सार्वजनिक उद्यम चयन बोर्ड (PESB)चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.