राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानं रचला विक्रम, ठरला YouTu वर सर्वाधिक पाहिला जाणारा लाइव्हस्ट्रीम, मिळाले तब्बल ‘इतके’ व्हूज!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. तो YouTube वर सर्वाधिक पाहिला जाणारा लाइव्हस्ट्रीम ठरला.

  नवी दिल्ली : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात (Ram Mandir) भाविक भगवान श्रीरामाचे दर्शन घेत आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पूर्ण झाला. टीव्हीपासून सोशल मीडियापर्यंत कोट्यावधी लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. आतायाबाबत एक मोठी अपडेट  समोर येत असून हा सोहळा YouTube वर सर्वाधिक पाहिला जाणारा लाइव्हस्ट्रीम (Most Watched Live Stream) ठरला आहे.  या कार्यक्रामाला तब्बल  19 दशलक्ष व्हूज मिळाले आहेत.

  चांद्रयान-3 लँडिंगला 8.09 लाख व्हूज

  22 जानेवारी 2024 रोजी नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनेलवरून पंतप्रधान मोदी लाइव्ह प्रसारण करण्यता आले. अयोध्या राम मंदिर LIVE व्हिडिओला 10 मिलियन लाईव्ह व्ह्यूज मिळाले आहेत. 23 ऑगस्ट 2023 रोजी ISRO द्वारे चांद्रयान 3 लँडिंग व्हिडिओ थेट स्ट्रीम करण्यात आला होता, ज्याला 8.09 दशलक्ष थेट दृश्ये मिळाली. विश्वचषक 2022 QF ब्राझील विरुद्ध क्रोएशिया 9 डिसेंबर 2022 रोजी CazéTV द्वारे च करण्यात आला. त्याला 6.14 दशलक्ष लाईव्ह व्ह्यूज मिळाले.

  यूट्यूबवर नरेंद्र मोदींचे २ कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स

  पंतप्रधान मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलचे 23,750 व्हिडिओ आणि 472 कोटी व्ह्यूजसह 2.1 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राइबर्स असलेले नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत. मोदींनंतर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोलसोनारो दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे जवळपास 64 लाख सबस्क्राइबर्स  आहेत.

  प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण

  प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे दोन व्हिडिओ ‘PM Modi LIVE’ म्हणून अपलोड करण्यात आले. अयोध्या राम मंदिर LIVE | ‘श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा’ आणि ‘श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा LIVE’ या शीर्षकांसह थेट प्रक्षेपण करण्यात आले.  नरेंद्र मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील लाईव्हस्ट्रीमला अनुक्रमे 10 दशलक्ष आणि 9 दशलक्ष लाइव्ह व्ह्यूज मिळाले आहेत. याने चांद्रयान-3 प्रक्षेपण, FIFA विश्वचषक 2023 आणि Apple लॉन्च इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रिमिंग याद्वारे स्थापित केलेले सर्व विक्रम मोडले.