
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या स्थानिक सहकारी संस्था या राजकारण विरहित असाव्यात. कारण शेतकरी कष्टकरी दुग्ध व्यवसायीक यांचे प्रपंच त्यावर अवलंबून असल्याने सहकारी संस्थेतील राजकारणाचा फटका सर्वसामान्य कुटुंबाला बसतो.
संगमनेर : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या स्थानिक सहकारी संस्था या राजकारण विरहित असाव्यात. कारण शेतकरी कष्टकरी दुग्ध व्यवसायीक यांचे प्रपंच त्यावर अवलंबून असल्याने सहकारी संस्थेतील राजकारणाचा फटका सर्वसामान्य कुटुंबाला बसतो. संगमनेर तालुक्यातील सहकार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला दिशादर्शक ठरला असून या सहकारी संस्था जपणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील नारायणगिरी महाराज सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन, संचालक मंडळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी विजयसिंह देशमुख, तुळशीराम मलगुंडे, किसन खेमनर, हौशीराम वाघमोडे, लक्ष्मण खेमनर, रावसाहेब खेमनर, किसन केरू खेमनर, माधव बाचकर, लहानु खेमनर, बाळकृष्ण खेमनर, बाबुराव खेमनर, बबन खेमनर, अनिता खेमनर, कविता वाकचौरे, आनंदा बर्डे, भैया मनियार व दूध उत्पादक, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक सहकारी दूध संस्थांनी गुणवत्तेला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. त्यांनी स्वच्छता, गुणवत्ता व पारदर्शक कारभार केला तर दूध उत्पादकांनाही फायदा होतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचाच आधार आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकारी दूध संस्था, सोसायटी, पतसंस्था या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या सहकारी संस्थेत राजकारण न करता संस्थेच्या हिताच्या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.
– रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, राजहंस दूध संघ