सोलापूर विद्यापीठातील संशोधन पाहून रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केला आनंद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध विभागात सुरू असलेले जागतिक दर्जाचे संशोधन पाहून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते परितेवाडीचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांनी आनंद व्यक्त केला.

    सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध विभागात सुरू असलेले जागतिक दर्जाचे संशोधन पाहून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते परितेवाडीचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांनी आनंद व्यक्त केला.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास सात कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केलेले सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी शनिवारी सदिच्छा भेट देऊन विविध विभागातील संशोधन कार्याची माहिती जाणून घेतली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी त्यांचे स्वागत केले. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. विकास पाटील यांनी भौतिकशास्त्र संकुलात सुरू असलेले जागतिक दर्जाच्या संशोधनाची माहिती दिली. विद्यार्थी व संशोधकांनी विकसित केलेले विविध उपकरणे, प्रोजेक्ट याचीही माहिती त्यांनी यावेळी डिसले यांना दिली. यावेळी डॉ. एस. एस. सूर्यवंशी हे उपस्थित होते.

    भौतिकशास्त्र विभागाने अमोनिया सेन्सर, नायट्रोजन डाय ऑक्साईड सेन्सर, कोविड संरक्षित विशेष मास्कला भारत सरकारकडून मिळालेल्या पेटंटचे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी कौतुक केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले संशोधन विद्यापीठ करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केला. टीव्ही व रेडिओ स्टुडिओ तसेच विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या पायाभूत सोयी सुविधांमुळे त्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.