अ‍ॅडल्टस्टार जॉनी सिन्ससोबतचा रणवीर सिंगची जाहीरात चर्चेत, पुरुषांच्या आरोग्य समस्येकडे वेधलं लक्ष; सोशल मीडियावर ट्रोल!

रणवीर सिंगन अ‍ॅडल्टस्टार जॉनी सिन्ससोबत एक जाहीरात केली आहे. पुरुषांच्या आरोग्यसेवा ब्रँडसाठी जागरूकता पसरवणारी ही जाहीरात आहे.

  बॅालिवूडचा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh ) नेहमी चर्चेत असतो. तो अनेकदा त्याच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असतो. अंतरगी कपड्यांमुळे त्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा रणवीर सिंग चर्चेत आहे. अ‍ॅडल्टस्टार जॉनी सिन्ससोबत ( Johnny Sins) तो एका जाहीरातीत झळकला आहे ज्यावरुन त्याला चांगलच ट्रोल केलं जात आहे. या जाहीरातीत तो त्याच्या विनोदी शैलीत, पुरुषांच्या लैंगिक आरोग्याबद्दल जनजागृती करताना दिसत आहे. एका वेलनेस ब्रँडसोबत भागीदारी करून एक अनोखे पाऊल उचलले आहे.

  रणवीरची ‘ती’ जाहीरात चर्चेत

  बोल्ड केअर या ब्रँडसाठी रणवीर सिंह आणि जॅानी सिन्स यांनी ही जाहीरात केली आहे. यामध्ये एक एक विवाहित तरुणी रणवीरकडे त्याचा भाऊ जॉनी सीन्सबद्दल तक्रार करताना दिसत आहे. जाहिरातीमध्ये द्विअर्थी संवाद आहेत. त्यातून ही जाहिरात पुरुषांच्या लैंगिक समस्येबाबत भाष्य करताना दिसत आहे. रणवीर सिंगने ही जाहिरात इन्स्टाग्रामवर अपलोड केली आहे. ही जाहीरात अपलोड केल्यानंतर काहींनी रणवीरला ट्रोल करणं सुरू केलं तर काहींनी त्याचं कौतुकही केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

  रणवीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, नुकताचं रॅाकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात अभिनेत्री आलिया भटसोबत झळकला होता. या चित्रपटाने बॅाक्सऑफिसवर चांंगला गल्ला जमवला होता.  येत्या काही दिवसात रणवीर रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर सिंघम अगेन आणि फरहान अख्तरच्या डॉन 3 मध्ये दिसणार आहे.