मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

    पिंपरी : मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केला. ही घटना तळेगाव-दाभाडे येथे घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    वसंत बबन भोगसे (वय ४२, रा. यशवंतनगर, तळेगाव-दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३६ वर्षीय पिडीत विवाहित महिलेने तळेगाव – दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोगसे याने फिर्यादी महिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच महिलेवर बलात्कार केला. तळेगाव – दाभाडे पोलीस तपास करत आहेत.