बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुजरातमधील धक्कादायक प्रकार

गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याशेजारी उभा असलेल्या बसमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे(Rape of a minor girl in a bus in Gujarat).

  गांधीनगर : गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याशेजारी उभा असलेल्या बसमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे(Rape of a minor girl in a bus in Gujarat).

  पोलिसांनी याबाबतची माहिती बुधवारी दिली. वडोदरा शहरात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
  2 जानेवारी रोजी रात्री उशिरा शहरातील न्यू व्हीआयपी रोड परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोघांचा शोध घेतला जात आहे.

  दोन जानेवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आदिवासी समाजातील 16 वर्षीय मुलीला अल्पवयीन मुख्य आरोपीसह दोन सहकाऱ्यांनी बसमध्ये खेचलं. फरार आरोपींनी मुलीला जबरदस्तीने बसमध्ये ओढण्यासाठी मुख्य आरोपीला मदत केली. त्यानंतर दोघेही बाहेर निघून गेले आणि बसला कुलुप घातलं. त्यानतंर अल्पवयीन आरोपीने मुलीवर बलात्कार केला.

  हे सुद्धा वाचा
  • 2022