धक्कादायक! लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या तरुणीला उचलून घेऊन जाऊन केला बलात्कार

लघुशंकेसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीला उचलून घेऊन जाऊन बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. नराधम आरोपी फरार झाला असून भोकरदन तालुक्यातील टाकळी हिवर्डी येथे घडली आहे(Rape of a young woman in Jalna).

    जालना : लघुशंकेसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीला उचलून घेऊन जाऊन बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. नराधम आरोपी फरार झाला असून भोकरदन तालुक्यातील टाकळी हिवर्डी येथे घडली आहे(Rape of a young woman in Jalna).

    रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या १८ वर्षाच्या तरुणीला उचलून घेऊन जाऊन आरोपीने तरुणीवर बलात्कार केला आहे. समाधान पालोदे असे बलात्कारी आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

    या घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित तरुणीने आरडाओरड केल्याने तिची आई, भाऊ हे घटनास्थळावर येताच त्यांनी आरोपीला पकडले. मात्र, तो पळून गेला.

    यानंतर पीडित तरुणीसह तिच्या नातवाईकांनी हसनाबाद पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरून हसनाबाद पोलिसांनी आरोपी समाधान पालोदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपी फरार आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.