हॉटेल व्यवसायात पार्टनर असलेल्या महिलेवर बलात्कार

कोंढवा पोलीस ठाण्यात निखिल भगत याच्यावर गुन्हा दाखल

    पुणे :  हॉटेल व्यवसायात पार्टनर असणाऱ्या सहकारी महिलेला पिस्तूलाचा दाख दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात निखिल प्रकाश भगत (रा. सनश्री सोसायटी, एनआयबीएम रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे.
    तक्रारदार महिलेला निखीलने हॉटेल व्यवसायात भागीदार होण्यास भाग पाडले. त्यांनी एकत्रित हॉटेल सुरू केले. यानंतर वेळोवेळी त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. तर, काही महिन्यांपुर्वी त्यांना पैसे देण्याच्या निमित्ताने कारमधून वानवडी भागात नेले. त्याठिकाणी रिवाल्वर सारख्या वस्तूचा धाक दाखवून त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केले व ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

    ९ वर्षांनी लैंगिक अत्याचाराची घटना उघड
    चतु:शृंगी भागात नऊ वर्षांनंतर ४ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. नातेवाईक असलेल्या ५३ वर्षीय व्यक्तीने तिचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. २०१३ मध्ये पांडवनगर भागात ही घटना घडली होती. याप्रकरणी मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीआहे. त्यानसार, ३७६ व पोस्कोनुसार गुन्हा नोंद केला आहे. चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी नेले. त्याठिकाणी तिच्याशी लैंगिक चाळेकरून तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हटले आहे. परंतु, नऊ वर्षांनी चिमुरडीने याची माहिती कुटूंबाला दिली. त्यानूसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.