पवारांना खुर्ची दिली म्हणून टीका करणाऱ्यांना राऊतांचं उत्तर

राऊत म्हणाले की, ‘कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या… त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत. बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला हे संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही सांगा त्यांना. ही चु**** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील”. असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला.

    नवी दिल्लीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोवरुन काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती. यावर आज संजय राऊतांना संताप अनावर झाला.

    यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘लालकृष्ण अडवाणी जरी असते तरी मी खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकृती आहे.’

    पुढं बोलताना राऊत म्हणाले की, ‘कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या… त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत,”

    “बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला हे संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही सांगा त्यांना. ही चु**** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील”. असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला.

    दरम्यान, दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 12 खासदारांना निलंबीत करण्यात आलं. यानंतर संबंधित सर्व खासदारांनी संसद भवनातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन पुकारलं आहे. शरद पवार या आंदोलनातील खासदारांसोबत चर्चा कऱण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत देखील उपस्थित होते. शरद पवार त्या ठिकाणी पोहोचताच राऊत यांनी पवारांना खूर्ची आणण्यासाठी धाव घेतली होती.