भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बच्चू कडूंवर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सरकारमध्ये रहायचे की नाही…’

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील मत मांडले आहे. सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली.

    सांगली : देशभरसर्वत्र लोकसभा निवडणूकीचे (Lok Sabha elections 2024) वार वाहू लागले आहेत. दरम्यान भाजपने (BJP) देखील आपली मोट बांधण्यास सुरुवात केली असून विरोधकांनी देखील आघाडी (INDIA Alliance) केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांना आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावर देखील मत मांडले आहे. सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली.

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रावरुन राज्यामध्ये निर्माण झालेल्या गोंधळावर स्पष्टीकरण दिले. बावनकुळे म्हणाले, “मराठा आणि ओबीसीमध्ये कोणताही संघर्ष नाही. मराठा समाजाला वेगळ आरक्षण देण्यासाठी सर्व्हे सुरू आहे.मराठा समाजाला टिकणार आरक्षणं सरकार देणार आहे. याबाबत जो गैरसमज निर्माण झालाय तो कुणबी समाजाबाबत आहे. कुणबीमधील व्यक्ती ओबीसीमध्ये येण्यास कोणाची हरकत नाही. तीन पिढ्यांपासून ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत. त्यांना ओबीसमध्ये घेण्यास कोणतीही अडचण नाही. पण मराठा समाजाला वेगळ आरक्षण दिलं पाहीजे. कुणबी नोंदी असणारा समाजच ओबीसीमध्ये येवू शकतो,” असे स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.

    तसेच महायुतीबरोबर सत्तेमध्ये सामील झालेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांची भूमिका देखील बदलत आहे. यामुळे बच्चू कडू सरकारमध्ये राहणार की जाणार असा प्रश्न समोर येत आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “सरकारमध्ये रहायचे की नाही हा बच्चू कडू यांचा अधिकार आहे,” असे एका वाक्यामध्ये बावनकुळे यांनी मत मांडले.

    लोकसभेसाठी भाजप पक्षाची तयारी सुरु

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश, राष्ट्र कल्याणाकरीता काम केलं आहे. मोदी यांची विकासकामे घेवून घरोघरी जाणार आहे. भाजप जे मताच कर्ज घेतलंय ते मताच कर्ज काम करून परत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ज्या ज्या विकासासाठी जनतेच लक्ष लागलं होते ती सर्व कामे मोदी सरकारने मार्गी लावली आहेत. मोदी यांच्या नेतृत्वात कामाची खूप मोठी शिदोरी आहे. पुन्हा एकदा मोदी यांच्या गॅरंटीवर जनता मतं देईल हे निश्चित आहे. मात्र निवडणुकाबाबत मला माहिती नाही. मी निवडणूक आयुक्त नाही. लोकसभा 2019 च्या निवडणुकीच्या वेळकापत्रकाप्रमाणे यावर्षी लोकसभा निवडणुकीचे अंजेडा दिसतोय. तसेच राज्यातील 48 लोकसभा मतदार संघातील महायुतीची कार्यालये सुरू झाली आहेत.” अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.