परस्पर संमतीने SEX झाल्यावर लग्नास नकार देणे म्हणजे फसवणूक नव्हे; गर्लफ्रेंडने केलेल्या बलात्काराच्या आरोपातुन बॉयफ्रेंडची निर्दोश सुटका

एखादी महिला निव्वळ लग्नाच्या आश्वासनावर व्यक्तीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करते, मात्र, आश्वासनाच्या तीन वर्षांनंतर त्याच्याविरोधात फसवणूक आणि बलात्काराची तक्रार दाखल करते त्यास फसणूक म्हणता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान दिला आणि आरोपी प्रियकराची आरोपीची निर्दोष मुक्तता केली. तसेच कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला(Refusing to marry after having consensual SEX is not cheating; Boyfriend acquitted of rape charges).

    मुंबई : एखादी महिला निव्वळ लग्नाच्या आश्वासनावर व्यक्तीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करते, मात्र, आश्वासनाच्या तीन वर्षांनंतर त्याच्याविरोधात फसवणूक आणि बलात्काराची तक्रार दाखल करते त्यास फसणूक म्हणता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान दिला आणि आरोपी प्रियकराची आरोपीची निर्दोष मुक्तता केली. तसेच कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला(Refusing to marry after having consensual SEX is not cheating; Boyfriend acquitted of rape charges).

    पिडिता महिलेच्या म्हणण्यानुसार, पालघरमध्ये राहणारा आरोपीचे तीन वर्ष तिच्यासोबत शारीरिक संबंध होते. लग्नाचे आश्वासन देऊन प्रियकराने शरीर संबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिल्याचा आरोप तरुणीने केला होता. मुलीच्या तक्रारीनंतर या तरुणाला पोलिसांनी कलम ३७६ आणि ४१७ अंतर्गत बलात्कार आणि फसणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

    या प्रकरणामध्ये १९ फेब्रुवारी १९९९ रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायामुर्तींनी प्रियकराला बलात्काराच्या आरोपामधून निर्दोष मुक्त केले. मात्र फसवणुकीच्या आरोपाखाली या प्रियकराला दोषी ठरवण्यात आले. त्याला आरोपीने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. त्यावर न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    सर्व साक्षी, पुरावे, जबाब आणि युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी आणि पिडीत महिला तीन वर्षांपासून आरोपीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. तसेच या महिलेने दिलेल्या जबाबावरुन तिची फसवणूक करुन तिच्यासोबत शरीर संबंध ठेवल्याचे आढळले नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. दोन्ही सज्ञान व्यक्तीं असून दोघांनीही परस्पर संमतीने संबंध ठेवले होते.

    आरोपी प्रियकराने खोटी माहिती किंवा फसवणूक करुन शरीर संबंध ठेवल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच तीन वर्ष नात्यामध्ये राहून शरीर संबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिल्यास त्यास फसवणूक म्हणता येणार नाही, आरोपीने खोटी माहिती देऊन लग्नाचे आमिष दाखवले हे सिद्ध करता आलेले नाही, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीला फसवणुकीच्या आरोपातूनही मुक्त केले.