महाराष्ट्रातून जास्तीत जास्त काँग्रेस सदस्य नोंदणी करा : नसीम खान

काँग्रेस पक्षाला १३७ वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे, काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यचळवळीत मोठे योगदान दिले आहे. तसेच स्वातंत्र्यानंतरही राष्ट्र उभारणीत मोलाचे कार्य केले आहे.

    • राज्यभर १३७ वा काँग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा

    मुंबई : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३७ वा स्थापना दिवस राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे माजी मंत्री तथा प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, किसान काँग्रेसचे श्याम पांडे, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    काँग्रेसची विचारधारा तळागाळातील जनतेत पोहचवा

    यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाला १३७ वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे, काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यचळवळीत मोठे योगदान दिले आहे. तसेच स्वातंत्र्यानंतरही राष्ट्र उभारणीत मोलाचे कार्य केले आहे. काँग्रेसची विचारधारा तळागाळातील जनतेत पोहचवा व सध्या सुरु असलेल्या काँग्रेस सदस्य नोंदणीमध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा, असे आवाहन नसीम खान यांनी केले.