घरकुल लाभार्थ्याची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन होणार : सीईओ दिलीप स्वामी

सोलापूर जिल्ह्यात जागे अभावी जी घरकुले सुरू झालेली नाहीत अशा घरकुलांना जागा उपलब्ध करून देणेसाठी नियोजन करणेत येत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी दिल्या. याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत गावठाण, सरकारी जागा उपलब्ध करून देणे बाबत नियोजन करण्यात आले.

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १४१९८ अपुर्ण घरकुले जानेवारी २०२२ अखेर पुर्ण करणेसाठी नियोजन करणेत आले आहे. गावपातळीवर घरकुल लाभार्थ्याची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करणेसाठी सहकार विभागाची मदत घेणेत येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदे मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निजीकक्षात महाआवास अभियान ग्रामीण २ अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक घेणेत आली. या बैठकी मध्ये मार्गदर्शन करताना सिईओ स्वामी बोलत होते.

    या बैठकी मध्ये मागील केंद्र पुरस्कृत ११४७८ व राज्य पुरस्कृत २७२० असे एकूण १४१९८ अपुर्ण घरकुले जानेवारी २०२२ अखेर पुर्ण करणे नियोजन करण्यात आले आहे. ही घरकुले पुर्ण करणेसाठी आवश्यक यंत्रणेकडून सहकार्य घेणे, तसेच कृती संगम करणेबाबत चर्चा करण्यात आली. गावपातळीवर घरकुल लाभार्थ्याच्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करणेकामी सहकार विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी तालुकास्तरावरून संबंधित गटविकास अधिकारी हे सहकार्य करतील. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मार्फत घरकुल लाभार्थ्यांना सौभाग्य योजना अंतर्गत बोज कनेक्शन, उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन, मनरेगा विभागामार्फत मनरेगा अनुदानाचा लाभ, स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातुन उपजिविकेचे साधन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणेसाठी अनुदान, घरकुल बांधकामासाठी बँके मार्फत अर्थसहाय्य करणे बाबत

    घरकुलांसाठा जागा उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न – अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे

    सोलापूर जिल्ह्यात जागे अभावी जी घरकुले सुरू झालेली नाहीत अशा घरकुलांना जागा उपलब्ध करून देणेसाठी नियोजन करणेत येत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी दिल्या. याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत गावठाण, सरकारी जागा उपलब्ध करून देणे बाबत नियोजन करण्यात आले. असल्याचे प्रकल्प संचालक धोत्रे यांनी सांगितले. बक्षिस पत्राच्या माध्यमातुन २५६ लाभार्थीनी जागेची मागणी केली आहे. अशा लाभार्थ्यांना जागा बक्षिस पत्र करून देणे बाबत कामी संबंधीत यंत्रणेस जिल्हाधिकारी यांचे द्वारा लेखी पत्राव्दारे सुचना देण्यात आले असल्याचे सांगणेत आले.

    जिल्हास्तरीय समिती सभेस उपस्थित असलेल्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यामाकामी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे प्रतिनिधी, अग्रणी बँक व्यवस्थापक मनरेगा कक्ष, प्रकल्प संचालक स्वच्छता विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सहा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग, सहाय्यक कामगार आयुक्त यांचे प्रतिनिधी जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.

    घरकुल लाभार्थ्यांना कृती संगम व्दारे लाभ देणेकामी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करावे व मेळाव्यास संबंधित विभागाचे प्रतिनिधी, अधिकारी यांनी उपस्थित राहून घरकुल लाभार्थीस कृती संगम व्दारे लाभ दयावा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.