Rituraj Gaikwad's Matching Virat Kohli's record

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी सुसाट सुरू आहे. सलग तीन शतकानंतर ऋतुराजला चौथ्या सामन्यात फार कमाल दाखवता आली नव्हती, परंतु मंगळवारी चंदिगडविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने शतकी खेळी केली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे पाचव्या सामन्यातील चौथे शतक ठरले. चंदिगडविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 132 चेंडूत सहा षटकार आणि 12 चौकारांच्या जोरावर 168 धावा कुटल्या(Rituraj Gaikwad's Matching Virat Kohli's record ).

    राजकोट : महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी सुसाट सुरू आहे. सलग तीन शतकानंतर ऋतुराजला चौथ्या सामन्यात फार कमाल दाखवता आली नव्हती, परंतु मंगळवारी चंदिगडविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने शतकी खेळी केली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे पाचव्या सामन्यातील चौथे शतक ठरले. चंदिगडविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 132 चेंडूत सहा षटकार आणि 12 चौकारांच्या जोरावर 168 धावा कुटल्या(Rituraj Gaikwad’s Matching Virat Kohli’s record ).

    विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

    विजय हजारे ट्रॉफीत केरळ संघाविरुद्ध ऋतुराजने 129 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकारांसह 124 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, त्याने छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात 143 चेंडूंत नाबाद 154 धावा चोपल्या होत्या. त्यातील 84 धावा या 14 चौकार व 5 षटकार अशा 19 चेंडूंत जोडल्या होत्या. मध्यप्रदेश विरुद्ध 329 धावांचा पाठलाग करताना ऋतुराजने 112 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकारांसह 136 धावा केल्या होत्या आणि छत्तीसगडविरुद्ध 276 धावांचा पाठलाग करताना त्याने निम्म्या धावा केल्या होत्या.

    मंगळवारी चंदिगड संघाविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 168 धावांची वादळी खेळी केली. दरम्यान, यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीत 500+ धावा करणारा ऋतुराज हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात चार शतक करणाऱ्या विराट कोहली, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल या पंक्तित आता ऋतुराजचे नाव सामील झाले आहे.