Video : जुन्नरमध्ये पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा; गोळीबारात कॅशिअरचा मृत्यू

जिल्ह्यातील नारायणगाव भागात असलेल्या एका पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात (Robbery in Junnar) आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कॅशिअरचा मृत्यू झाला असून, त्यांनी अडीच लाखांची रोकड चोरून नेली आहे.

    पुणे : जिल्ह्यातील नारायणगाव भागात असलेल्या एका पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात (Robbery in Junnar) आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कॅशिअरचा मृत्यू झाला असून, त्यांनी अडीच लाखांची रोकड चोरून नेली आहे.

    राजेंद्र दहशत भोर (वय 52) असे ठार झालेल्या कॅशिअरचे नाव आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव परिसरात अनंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आहे. याठिकाणी आज काही वेळापूर्वी संस्थेत शिरलेल्या दोन हल्लेखोरांनी प्रवेश केल्यानंतर कॅशिअर राजेंद्र भोर यांच्यावर पिस्तूल तानत रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी या हल्लेखोरांनी भोर यांच्यावर गोळी झाडत त्यांच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या गोळीबारात भोर ठार झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

    हेल्मेट परिधान करून दोन हल्लेखोर आले होते. दुचाकी घेऊन ते पसार झाले होते. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार शिरूर तालुक्यात देखील घडला होता. कारमधून आलेल्या या दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकला होता.