
हे सर्व 6 दरोडेखोर बंगल्यात घुसताना चेहऱ्यावर मास्क, तोंडाला काहीही न बांधता उजळमाथ्याने घुसले होते. त्यामुळे ज्या घरात चोरी झाली त्या घरातील लोकांकडून माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
सांगली : एखाद्या घरात घुसून दरोडेखोरांनी घरातील लोकांना दमदाटी करत त्यांचे हातपाय बांधत त्यांच्या घरातील दागीने ( Sangali Robbery News) लंपास केल्याचा सीन आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिला असलेच. पण काहीशी घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. सांगलीत अशाचप्रकारे फिल्मी स्टाईलने घरात घुसून घरातल्या लोकांचे हातपास बांधून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण आहे.
चिंचवाडे दत्तनगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच ते सहा जणांनी घराच्या मागील बाजूने दरवाजाचा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातली सगळी मंडळी गाढ झोपेत होती. दरोडेखोरांनी घरातील झोपलेल्या लोकांना उठवून घातक हत्यारांचा धाक दाखवला. कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर त्यांचे हातपाय बांधले. मग घरातील चार लाखाचे सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले अशी फिर्याद कुटुंबाकडून देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केलीत.पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सर्व 6 दरोडेखोर बंगल्यात घुसताना चेहऱ्यावर मास्क, तोंडाला काहीही न बांधता उजळमाथ्याने घुसले होते. त्यामुळे ज्या घरात चोरी झाली त्या घरातील लोकांकडून माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.